Satara Accident News Saam TV
महाराष्ट्र

Satara Accident News: एसटी बस-बाईकमध्ये भीषण अपघात, पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Satara News : लोणंद-निरा रोडवर रेल्वे उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झाला.

ओंकार कदम

Satara News: साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसटी बसने दिलेल्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला आहे. एसटी बस आणि बाईक यांच्यातील धडक इतकी जोरदार होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

अनिल नामदेव थोपटे -गायकवाड वय २५ वर्ष, पोपट अर्जन थोपटे -गायकवाड वय २३ वर्ष, ओंकार संजय थोपटे-गायकवाड वय २२ वर्ष अशी अपघातातील मृत्यांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद-निरा रोडवर म्हणजेच लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर एसटी व मोटरसायकलची जोरदार धडक झाली. या धडकेत मोटरसायकलवरील तीन युवक जागीच ठार झाले. गुरुवारी रात्री मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि निरेकडून लोणंद निघालेले तीन तरुणांची बाईक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघाताची तीव्रता एवढी होती की यामध्ये मोटरसायकलवरील तिन्ही तरुण जागीच ठार झाले. (Latest MArathi News)

अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणांचे मृतदेह मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

तिन्ही मृत तरुण पुण्याचे

अपघतातील मृत अनिल नामदेव थोपटे -गायकवाड, पोपट अर्जन थोपटे -गायकवाड, ओंकार संजय थोपटे हे तिघेही पुण्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथील रहिवाशी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर

Gadchiroli News: गडचिरोलीत पोलिसांनी कट उधळला, पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ बॉम्बस्फोट

Pakistan Air Pollution : वायू प्रदुषणामुळे पाकिस्तानात आणीबाणी, तब्बल 20 लाख लोकांची प्रकृती बिघडली, लाहोरमधला आकडा धक्कादायक

Screenshot ला मराठीत काय म्हणतात? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर

KVP Yojana: खुशखबर! या योजनेत गुंतवलेले पैसे होणार डबल, गुंतवणूदारांना फायदाच फायदा; योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

SCROLL FOR NEXT