Bhandara News : आई-वडिलांच्या पाया पडून म्हणाला, 'मला आशीर्वाद द्या'; घराबाहेर पडला तो परतलाच नाही

Bhandara News : विशाल बागडे असं मृत युवकाचं नाव असून तो गांधी वॉर्ड भंडारा येथील रहिवासी आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 28 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली येत आत्महत्या केली आहे. वरठी येथील रेल्वेच्या फाटकाजवळ ही घटना घडली आहे. विशाल बागडे असं मृत युवकाचं नाव असून तो गांधी वॉर्ड भंडारा येथील रहिवासी आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सायकल घेऊन वरठी येथे आला होता. सायंकाळी फाटक बंद असताना काही नागरिकही तेथे थांबले होते. त्या गर्दीत विशाल देखील होता. दरम्यान तेथे मालगाडी आली होती. ही गाडी वेगाने पुढे जात असताा विशालने अचानक स्वतः ला रेल्वेसमोर झोकून दिले. (Latest Marathi News)

Crime News
Sandeep Deshpande Attack News: संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट, हल्ल्याचं कारणही आलं समोर

मालगाडीच्या धडकेनंतर तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांचा तिथेच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी घटनेनंतर विशालच्या कुटुंबियांचा शोध सुरु केला. सायंकाळी त्याच्या वडिलांनी येऊन मृतदेहाची ओळख पटवली. (Breaking News)

Crime News
NCP Upset on Nana Patole : काँग्रेस नेत्यांनंतर राष्ट्रवादीही नाना पटोलेंवर नाराज? कारणही आलं समोर

आदल्या दिवशी घरून सायकल व सोबत बॅग घेऊन निघताना तो आई-बाबांचा पाया पडला होता व मला आशीर्वाद द्या, असे म्हणाला होता. मुलगा काम शोधण्यासाठी जात असावा, असं आई-वडिलांना वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने विशालचा मृतदेह पाहण्याची वेळ त्याच्या कुटुंबियांनावर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्येचे कारणही अद्याप कळू शकलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com