satara, shivendraraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara News : नागरिकांनाे ! सातारा पालिकेत घरपट्टी वाढीवर अपील केलेय, मग हे वाचाच

गेल्या महिन्याभरापासून नागरिक पालिकेत घरपट्टी कर आकारणी वाढीच्या विराेधात अपील अर्ज दाखल करीत हाेते.

साम न्यूज नेटवर्क

Satara News : सातारा पालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्याचा निर्णय घेत नागरिकांना नोटिसा बजावल्या होत्या. या अन्यायकारक घरपट्टी वाढीच्या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेऊन पालिका प्रशासनाच्या प्रक्रियेला जोरदार विरोध केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ही प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला हाेता. परंतु पालिका प्रशासनाने सुनावणी स्थगित केली नव्हती. (Breaking Marathi News)

दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा पालिका प्रशासनाने येत्या साेमवारपासून घरपट्टी हरकतीवरील सुनावणी स्थगित केली आहे. या निर्णयामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे (shivendraraje bhosale) यांच्या भुमिकेला बळ मिळाल्याचे बाेलले जात आहे. (Maharashtra News)

सातारा पालिकेच्या हद्दीतील सर्व मिळकतधारांना पालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणीबाबत नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. ही अन्यायकारक करवाढ होऊ नये तसेच पालिकेची निवडणूक झाल्यांनतर समिती गठीत होऊन कर वाढीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करीत सध्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी असे निवेदन आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी अभिजित बापट यांना देण्यात आले होते. याशिवाय प्रक्रिया स्थगित न झाल्यास आंदोलन करू असा इशारा पालिका प्रशासनाला दिला होता.

त्यानंतर आमदार भाेसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेऊन घरपट्टी कर वाढीस आणि त्यावर सुरु असलेली प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी केली होती. त्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला हाेता.

दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे अखेर पालिका प्रशासनाने चतुर्थ वार्षिक कर वाढ हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया रद्द केल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या साेमवारपासून (satara) शाहू कला मंदिर येथे तीन दिवस घेतली जाणारी सुनावणी हाेणार नाही. याबाबत पालिका प्रशासनाने देखील दुजाराे दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

SCROLL FOR NEXT