satara, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale, Devendra Fadnavis, Satara Lok Sabha Constituency, Narendra Patil, Vikram Pawaskar saam tv
महाराष्ट्र

Satara News : उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचा विराेध? सातारा लोकसभेसाठी भाजपचा नव्या उमेदवाराचा शोध सुरु, 'ही' नावे चर्चेत (पाहा व्हिडिओ)

आजच्या बैठकीत फडणवीस हे कमिटीकडून काही महत्वाच्या बाबी समजून घेणार आहेत.

संभाजी थोरात

Satara News : सातारा लाेकसभा मतदारसंघात (satara lok sabha constituency) खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांना तीन विधानसभा मतदारसंघातील विराेध लक्षात घेता आणि आता आमदार शिवेंद्रराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांच्या रुपाने चाैथ्या मतदारसंघात विराेध लक्षात घेता भाजपने लाेकसभेसाठी उदयनराजेंबराेबरच अन्य एका तगड्या उमेदवाराचा शाेध सुरु केला आहे. भाजपातून अधिकृतरित्या याबाबत बाेलले जात नसले तरी उदयनराजेंबद्दल नाराजी सूर पक्षात (Satara BJP) आहे. (Maharashtra News)

सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या (BJP) कोअर कमिटीची आज (गुरुवार) कराड येथे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासमेवत बैठक हाेणार आहे. या बैठकीत फडणवीस हे कमिटीकडून काही महत्वाच्या बाबी समजून घेणार आहेत. दरम्यान या बैठकीत खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्याविषयी असलेली नाराजी फडणवीस यांच्यापर्यंत पाेहचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील (shriniwas patil) यांनी लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव केला. त्यानंतर उदयनराजे भाेसले हे राज्यसभा खासदार झाले. परंतु पक्षाच्या याेजना असाेत अथवा त्यासाठीचे कार्यक्रम यामध्ये उदयनराजे हे काेठे दिसत नाहीत असा नाराजीचा सूर भाजपात आहे.

त्यामुळे भाजपाने उदयनराजेंसह अन्य एका उमेदवाराचा शाेध घेण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबराेबरच हिंदु एकता आंदाेलनचे संघटक विक्रम पावस्कर यांना देखील लाेकसभेची उमेदवारी द्यावी असा सूर कराड शहरातून आहे.

पुढील नऊ महिन्यांत सातारा लाेकसभा मतदारसंघात भाजप नवीन उमेदवार देऊ शकताे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT