koyna dam
koyna dam 
महाराष्ट्र

सांगलीकरांची चिंता मिटली; काेयना धरणाचे दरवाजे झाले बंद

Siddharth Latkar

सातारा : काेयना धरण koyna dam क्षेत्रात पावसाचा जाेर कमी झाला आहे. धरण व्यवस्थापनाने आज (बुधवार) सकाळी नऊ वाजता धरणाचे सर्वच्या सर्व सहा वक्र दरवाजे बंद केले आहेत. यामुळे काेयना नदीत हजाराेंनी हाेणारा पाण्याचा विसर्ग केवळ २१०० क्यूसेक इतका झालेला आहे.

काेयना धरणातून पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यास त्याचा फटका नदी काठच्या गावांसह सांगली Sangli जिल्ह्यास बसताे. पावसाचा जाेर कमी झाल्याने काेयना धरण व्यवस्थापनाने जलपातळी नियंत्रणाचे दृष्टीने उपाययाेजना करुन सहा वक्र दरवाजे बंद केले आहेत.

सध्या काेयना भागात पावसाचा जाेर कमी झालेला आहे. गत २४ तासांत काेयना भागातील काेयनानगरला १०६ मिली मीटर (एकूण ३२७८), नवजा १५९ मिली मीटर (४१८०), महाबळेश्वर ८० मिली मीटर (४२७३) पावसाची नाेंद झालेली आहे अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

काेयना धरणाची जलपातळी २१४७ फूट असून सध्या धरणात ८५.८८ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. धरणात गत २४ तासांत सरारी १९ हजार ५२० क्यूसेक पाण्याची आवक हाेती. धरणाचे सहा वक्र दरवाजे सकाळी नऊ वाजता बंद करण्यात आले आहेत.

त्यापुर्वी सकाळी आठ वाजता सहा वक्र दरवाज्यातून काेयना नदी पात्रात १० हजार १३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात हाेता. सध्या २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे असेही धरण व्यवस्थापनाने नमूद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

SCROLL FOR NEXT