चर्चाच चर्चा! पवार हरले, मोहिते - पाटील जिंकले; सेनेची साथ

ajit pawar vijaysinh mohite patil
ajit pawar vijaysinh mohite patil
Published On
Summary

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांनी ही या मागणीला पाठींबा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्रि एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला होता.

पंढरपूर : अकलूजचे मोहिते - पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे.‌ मोहिते पाटील विरोधी पक्षात असतानाही अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेने देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध डावलून मोहीते पाटलांची मागणी पूर्ण केली आहे. यामध्ये पवार हरले अन् मोहिते जिंकले अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. (akluj-natepute-malwadi-muncipal-council-decision-ajit-pawar-shivsena-vijaysinh-mohite-patil)

अकलूज- माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपरिषद आणि नगरपंचायती रूपांतर करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला हाेता. प्रशासकीय यंत्रणेस तसे आदेश दिले होते. दरम्यान राज्यात निवडणुका झाल्या आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतींचे प्रस्ताव लाल फितीत अडकले. ग्रामपंचायतींचे पालिका आणि नगरपंचायत करणे याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांचा विरोध होता. तसा आरोप ही मोहिते-पाटील vijaysinh mohite patil यांच्याकडून वारंवार केला जात होता.

याच मागणीसाठी गेली त्रेचाळीस दिवस अकलूज ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी पाठिंबा देत सरकारकडे ही मागणी लावून धरली होती.

दरम्यान या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी देखील राज्याचे नगरविकास मंत्रि एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांनी ही या मागणीला पाठींबा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्रि एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला होता.

मंगळवारी (ता. ३) राज्य सरकारने अकलूज ग्रामस्थांची मागणी मान्य करत अकलूज- माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर परिषद व नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा अध्यादेश काढला.

ajit pawar vijaysinh mohite patil
उध्दव ठाकरेंचा शिवशाही नव्हे तर सुलतानी कारभार; व्यापा-यांचा आराेप

अकलूजकरांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध असतानाही शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र अकलूजकरांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवत राष्ट्रवादीवर मात केल्याची चर्चा गावा गावांमध्ये सुरू झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com