उध्दव ठाकरेंचा शिवशाही नव्हे तर सुलतानी कारभार; व्यापा-यांचा आराेप

uddhav thackreay
uddhav thackreay

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवशाही सरकार चालवत नाहीत तर सुलतानी कारभार चालवत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया सांगलीच्या व्यापा-यांतून उमटली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना धमकी दिली नाही तर पोट तिडकीने आमचे प्रश्न मांडले परंतु मुख्यमंत्र्यांची आडमुठी भुमिका हे मराठी माणसांच्या मुळावर घाव घालणारी ठरत असल्याचेही व्यापा-यांचे म्हणणे आहे. (sangli-traders-angry-on-break-the-chain-decision-of-maharashtra-chief-minister-uddhav-thackreay-sml80)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackreay यांनी साेमवारी (ता.२) सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दाैरा केला. त्यानंतर त्यांनी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यापा-यांच्या धमकीला मी घाबरत नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्यबाबत व्यापा-यांनी आज (मंगळवार) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गोपाळ मर्दा म्हणाले सन २०१९ मधील पूरापासून सांगली बाजारपेठेतील गणपती मंदिरापासून ते सांगली काॅलेजपर्यंतच्या व्यावसायिकांचे आजपर्यंत काेणताच दिलासा मिळालेला नाही. यंदा देखील वेगवेगळ्या साहित्य विक्रीची दुकाने चार दिवस पाण्यात हाेती. सर्वांचे अताेनात नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साेमवारी पाहणी दाैरा केला. आमचे चार महिन्यांचे सर्व प्रकारचे सरकारी कर १०० टक्के माफ करावेत. याबराेबरच पुढील चार महिन्यांचे कर माफ करावेत अशी मागणी व्यापा-यांनी केली आहे. याबराेबरच बॅंकांच्या कर्जावरील व्याज माफ करावे. पुर्वी आम्हांला ५० हजार रुपयांची अद्याप मदत मिळालेली नाही. पुर्वीपेक्षा दुप्पट मदत निधी मिळावा. आमच्या मानसिकेतचा विचार करावा. अर्थसहाय मिळाले तरच व्यापारी वर्ग टिकेल अन्यथा ताे संपून जाईल.

काेणत्या ही व्यापा-यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असाे अथवा सरकारला धमकी दिलेली नाही. आम्ही पाेटतिडकीने बाेलत असताे. हे सरकारने लक्षात घ्यावे असे सतीश सारडा यांनी नमूद केले. लवकरात लवकर सरकारने निर्णयाचा पुर्नविचार करावा अशी अपेक्षा सारडा यांनी व्यक्त केली.

uddhav thackreay
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मनातील चिंता, म्हणाले...

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मनातील चिंता, म्हणाले...गणेश जोशी म्हणाले, गेले पाच महिने काेविड १९ मुळे सांगलीतील व्यापार ठप्प आहे. काेल्हापूर आणि पुण्यातील बाजारपेठा खूल्या झाल्या आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली हाेती. सांगलीमधील लाॅकडाउन किमान वेळेसाठी संपुष्टात आणा परंतु मुख्यमंत्र्यांनी मी व्यापा-यांच्या मागणीला भीक घालणार नाही असा शब्द प्रयाेग केला. त्यांचा हा शब्द प्रयाेग शिवशाहीतील नसून सुलतानी आहे असे आमचे मत झालेले आहे. व्यापारी केवळ त्यांचे कुटुंबाचे पाेट भरत नाही. प्रत्येक दुकानात पाच ते सहा कामगार वर्ग आहेत. सांगलीच्या बाजारपेठेत किमान तीन ते सहा हजार दुकानदार आहेत. या सर्व दुकानांच्या माध्यमातून २५ हजार मराठी तरुणांना राेजगार उपलब्ध करुन दिला जाताे. अशा वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आडमुठी भुमिका अथवा धाेरण हे मराठी माणसांच्या मुळावर आणणारे आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com