KHED SARPANCH SUSPENDED OVER RS 16.77 LAKH IRREGULARITIES IN SATARA AI
महाराष्ट्र

Lata Pharande : महिला सरपंचाने केला मोठा घोटाळा, प्रशासनाकडून मोठी कारवाई, साताऱ्यात राजकीय वर्तुळात खळबळ

Satara Khed Lata Fharande Suspended : साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांना १६.७७ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी निलंबित करण्यात आले. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप

  • १६.७७ लाख रुपयांचा कथित निधी अपव्यय उघड

  • पुणे विभागीय आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई

  • प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यातील खेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांच्यावर तब्बल पावणे सतरा लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार केला असून त्यांना थेट निलंबित करण्यात आले आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या सुनावणीनंतर हा धडक निर्णय जाहीर करण्यात आला. या कारवाईमुळे खेडसह संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच लता फरांदे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थ आणि विरोधी गटांकडून गंभीर आरोप करण्यात येत होते. ग्रामपंचायतीतील निधीचा अपव्यय, कामांमध्ये अनियमितता आणि अधिकारांचा गैरवापर केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर सखोल चौकशी सुरू करण्यात आली होती.

प्राथमिक तपासानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक बाबींमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर फेरचौकशी करण्यात आली असता काही आरोप अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीच्या वापरात पारदर्शकता नसल्याचे आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. फरांदे यांनी १६ लाख ७७ हजार १४३ गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून विभागीय आयुक्तांनी सरपंच लता फरांदे यांना पदावरून निलंबित करण्याचा अंतिम आदेश दिला. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कारवाईनंतर खेड तालुक्यात राजकीय खळबळ उडाली असून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आगामी काळात या प्रकरणाची पुढील चौकशी आणि त्यातून उघड होणारे तपशील याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, ग्रामपंचायतीतील प्रशासन आणि पारदर्शकतेबाबत हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक हरपली; बाजारभावात मोठी पडझड, जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? ₹१५०० बंद का झाले? वाचा सविस्तर

हॉटेलसारखा पुलाव घरी होत नाही? फक्त १ चमचा वापरा 'हा' घरगुती मसाला; चव होईल दुप्पट

Maharashtra News Live Update: पेणमधील 35 हजार गणेशमूर्ती परदेशी रवाना

देशात पहिल्यांदाच! आता पाण्याचाही मिळणार 'सातबारा'; पाहा महाराष्ट्र सरकारचा काय आहे प्लॅन

SCROLL FOR NEXT