aaditya thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Satara DCC Bank: ...अन्यथा सामाजिक लढे, स्थलांतरण, राजकीय तेढ वाढतील : आदित्य ठाकरे

प्रत्येक नागरिकाने पर्यावरण जाेपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : ग्लाेबल वाॅर्मिग (global warming) पहायचे असल्यास अन्य देशात पाहू नका तर आपल्या गावापासून पाहण्यास सवय लावा. पर्यावरण जाेपासा अन्यथा भविष्यात ग्लाेबल वाॅर्मिंगमुळं सामाजिक लढे वाढतील, स्थलांतरण (mirration) वाढेल कदाचित राजकीय संघर्ष देखील वाढतील अशी भिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केली. (satara latest marathi news)

ग्लाेबल वाॅर्मिंग- ग्लाेबल वाॅर्निंग (global warming) या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (satara dcc bank) आणि लायन्स क्लब यांच्यावतीने आयाेजिलेल्या परिषदेत विविध तज्ञांनी मते मांडली. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी जिल्हा बॅंकेने आयाेजिलेल्या उपक्रमाचे काैतुक करुन पर्यावरण जपण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे उदघाटन (satara) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (ramraje naik nimbalkar), जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील (nitin patil) यांच्यासह संचालक मंडळ व पर्यावरणप्रेमी उपस्थित आहेत.

मंत्री ठाकरे म्हणाले क्लायमेटायझेशन (हवामानीकरण) , लवचिकता (resilience) आणि बदल स्विकारणे (adaptation) या तीन गाेष्टींवर काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्ती जास्त झाड लावणं गरजेचे आहे. पायी चालत जाणे, सार्वजनिक वाहतुक वापरणे यावर भर देणे. याबराेबरच आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

February Grahan 2026: फेब्रुवारीमध्ये १५ दिवसात दोनवेळा लागणार ग्रहण; किती धोकादायक आहे ग्रहण? काय आहेत संकेत

Maharashtra Live News Update: आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल, वीजपुरवठा राहणार बंद

Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत; गॅस टँकर उलटल्याने झाला होता खोळंबा

SCROLL FOR NEXT