Satara Latest News Saamtv
महाराष्ट्र

Satara Crime: संशय आल्याने दुध टँकर थांबवला, उघडून पाहताच सगळेच हादरले; नेमकं काय घडलं?

Satara Latest News: साताऱ्यात उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये २० लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे.

ओंकार कदम

Satara Crime:

दुधाच्या टॅंकरमधून दारु विक्री होत असल्याचा अजब आणि धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यामधून समोर आला आहे. साताऱ्यात उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून २० लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, साताऱ्यात (Satara) उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये दुधाच्या टॅंकरमधून चक्क दारु विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. चिपळूण कराड रस्त्यावर गोशाटवाडी येथे दुध टॅंकरची चौकशी केली असता समोरचे चित्र पाहून पोलीसही हादरुन गेले.

साताऱ्यातील (Satara) चिपळूण कराड मार्गावर मौजे गोशाटवाडी गावच्या हद्दीत कराडच्या दिशेने निघालेल्या सकस दुधाच्या सहा चाकी वाहनाला संशय आल्याने अडवण्यात आले. या कारवाईत गोवा बनावट दारूचे एकूण 25 बॉक्स असलेला 19 लाख 75 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने पकडला. याप्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वर्ध्यात वनविभागाची कारवाई...

वर्ध्यात (Wardha) एका हॉटेलात सुरु असलेल्या ओल्या पार्टीत चक्क हरिणाच्या मांसावर ताव मारणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सावंगी हद्दीतील टी पॉईंटवर असलेल्या ठाकरे किचन हॉटेलात वन विभागाकडून कारवाई करण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT