Satara Crime Saam Tv
महाराष्ट्र

Satara Crime: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राचार्याविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

Satara Student Dies: साताऱ्यात विद्यार्थिनीने आत्महत्या केली. हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत तिने आयुष्य संपवलं. या घटनेनंतर साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

Priya More
  • साताऱ्यात लेडीज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

  • विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणात प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल

  • विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर प्राचार्य आणि रेक्टरविरोधात कारवाई

  • विद्यार्थिनीने हॉस्टेलच्या शौचालयाबाबत तक्रार केली होती

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यामध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. लेडीज हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत तिने आयु्ष्य संपवलं. या घटनेनंतर आता प्राचार्यांसह हॉस्टेलचे रेक्टर आणि हॉस्टेल कमिटीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीने हॉटेलमधील शौचालयाबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर तिच्यावर दबाव टाकला जात होतो. त्यामुळे तिने आत्महत्या केली. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या लेडीज हॉस्टेलमध्ये ही घटना घडली. या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सृष्टी भानुदास बिरामणे (वय १८ वर्षे) या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारत तिने आपले जीवन संपवल्याची ही दुर्दैवी घटना २ सप्टेंबर २०२६ रोजी घडली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

हॉस्टेलमधील शौचालयातील गैरसोयींबाबत तक्रार केल्यामुळे आणि व्हिडिओ काढल्यामुळे होस्टेलच्या रेक्टर जयश्री जकाते आणि कमिटी सदस्यांनी विद्यार्थिनी सृष्टीवर दबाव आणला होता. तिची मानसिक कुचंबणा करून कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली. या मानसिक त्रासाला आणि दबावाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कारण समोर आले आहे.

या प्रकरणात संबंधित कॉलेजचे प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सातारा शहर पोलिस ठाण्यात हॉस्टेलच्या रेक्टर जयश्री जकाते, कॉलेजचे प्राचार्य सुरेश साळुंखे आणि होस्टेल कमिटी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सातारा शहर पोलिस करत आहेत. सृष्टीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

शिंदेसेना मंत्रिपदाची भाकरी फिरवणार? दसऱ्यानंतर शिंदेसेनेत फेरबदलाचे संकेत

अभिजित दिपकेंना सशर्त जामीन मंजूर, कुमारांविरोधातील आंदोलन थंडवणार की चिघळणार? तिहारमध्ये असलेल्या दास आणि रांकांचं काय होणार?

गोकुळसाठी यल्लमादेवीची शपथ, देवीचा धाक दाखवून मिळणार सत्ता? मंत्र्यांनी मोडला अंधश्रद्धा निर्मुलन कायदा?

SCROLL FOR NEXT