satara, satara rain saam tv
महाराष्ट्र

Satara Rain Update : साता-यात पावसाची संततधार, पाटणला दरड काेसळली; उद्या रेड अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

satara collector jitendra dudi : जे अधिकारी अथवा कर्मचारी हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ करतील त्यांच्या कठाेर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी डुडींनी आदेशात म्हटले आहे.

Siddharth Latkar

Satara News : भारतीय हवामान विभागाने उद्या (मंगळवार) सातारा जिल्ह्याला रेट अलर्टचा इशारा दिला आहे. यामुळे उद्या पावसाचा जाेर वाढण्याची शक्यता असल्याने ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन, दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो. त्या गावांमधील नागरिकांना पुर्व सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करावी असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (satara collector jitendra dudi) यांनी महसूल विभागास दिले आहेत. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यात आज (मंगळवार) पावसाचा कमी प्रमाणात आहे. आज पाटण तालुक्यातील टोळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली. या परिसरात आणखी दरड कोसळण्याचा धोका असल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. दरम्यान टोळेवाडीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता असल्याची माहिती पीडब्ल्यूडीने दिली.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने उद्या सातारा जिल्हयात रेड अलर्ट घोषीत केला आहे. भारतीय हवामान विभागाकडून सातारा जिल्हयाला ज्या-ज्या वेळी रेड अलर्ट अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा देण्यात येईल अशावेळी पश्चिमेकडील तालुक्यातील विशेषत: पाटण (patan), महाबळेश्वर (mahabaleshwar rain), वाई (wai), जावली (jawali) व सातारा (Satara Rain Red Alert) या तालुक्यामध्ये तसेच उर्वरित तालुक्यामधील ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन, दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो.

अशा गावांमधील नागरिकांना पूर्व सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांची राहिल असा आदेश जिल्हाधिकारी डूडी यांना काढला आहे.

जे अधिकारी अथवा कर्मचारी हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारवाई करणेत येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: परीक्षा फी भरली म्हणून आयोगाची मनसे उमेदवाराला नोटीस

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

SCROLL FOR NEXT