Maharashtra unseasonal Rain:  Saamtv
महाराष्ट्र

Satara News: दुर्दैवी! धावत्या इलेक्ट्रिक स्कुटीवर वीज पडून मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू; २ जखमी

Maharashtra unseasonal Rain: दोन दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विविध भागांमध्ये पावसाने शेती मालाचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

ओंकार राजेंद्र कदम

सातारा, ता. १२ मे २०२४

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विविध भागांमध्ये पावसाने शेती मालाचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये इलेक्ट्रिक बाईकवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुक्यातील सरडे येथे तीन तरुण आपल्या इलेक्ट्रिक मोटार सायकलवरुन जात होते. याचवेळी त्यांच्या गाडीवर वीज पडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर गाडीवरील दोन जण गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर तिघांनाही तात्काळ बारामती येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.

ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले (वय, 17 रा. वंजारवाडी, तालुका.जामखेड, जिल्हा.अहमदनगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रथमेश सुनील भिसे (वय 17 रा. वायसेवाडी, तालुका. कर्जत, जिल्हा अहमदनगर) आणि विक्रम विजय धायगुडे, (वय. 16, रा. सरडे) अशी अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, मावळ परिसरातील गहूंजे गावातील पवना नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निखिल यादव असं या तरुणाचे नाव असून तो काही मित्रानं सोबत पवना नदीत पोहण्यासाठी गेला होता. पवना नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या मुलाचा बुडून मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Beetroot Cutlet Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी १० मिनीटात बनवा हॉटेल स्टाईल रवा बीटरूट कटलेट, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: पुण्यात बर्निंग कारचा थरार, 5 ही पर्यटक सुखरूप

Masala Khichdi Recipe : अवघ्या १० मिनिटांत बनवा चटपटीत मसाला खिचडी, संडे स्पेशल डिनर

IND-W vs SA-W: क्या बात, क्या बात! 21 धावा करताच स्मृती मंधानानं रचला विक्रम

Sunday Horoscope : अडचणीचा सामना करावा लागणार; 5 राशींच्या लोकांना मनोबल सांभाळावे लागेल

SCROLL FOR NEXT