Pimpari Chinchwad News: 'भाऊंच्या विरोधकाला जागा दाखवा', पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टर वॉर; अज्ञातांनी लावले बॅनर

Maharashtra Loksabha Election 2024: पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टर वॉर उफाळून आले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकाच्या नावाने नवी सांगवी परिसरात लावलेले पोस्टर्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे
Maharashtra Loksabha Election 2024:
Maharashtra Loksabha Election 2024:Saamtv

पिंपरी चिंचवड, ता. १२ मे २०२४

राज्यात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. पुणे मावळसह ११ लोकसभेच्या जागांवर उद्या मतदान होणार आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टर वॉर उफाळून आले आहे. पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकाच्या नावाने नवी सांगवी परिसरात लावलेले पोस्टर्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एन आदल्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थकांनी नवी सांगवी परिसरामध्ये बॅनरबाजी केली आहे. "हीच ती वेळ आहे भाऊच्या विरोधकाला त्याची जागा दाखवायची, कट्टर समर्थक लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत.

लक्ष्मण जगताप यांच्या निनावी समर्थकांनी हे बॅनर लावले आहेत. सांगवी परिसरामध्ये लावण्यात आलेले बॅनर अनेक अर्थाने वादग्रस्त आहेत. कारण लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग आप्पा बारणे यांच्यात राजकारणात गेली कित्येक वर्ष राजकीय वैर होत. या उद्देशाने ही बॅनर बाजी झाली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे.

Maharashtra Loksabha Election 2024:
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढत आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष शंकर जगताप हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत आहेत. अशातच हे बॅनर वॉर समोर आल्याने याचा निवडणूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Loksabha Election 2024:
Uddhav Thackeray: आपण औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झाला आहात का? संजय राऊतांचा सवाल; उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com