Uddhav Thackeray Interview
Uddhav Thackeray InterviewSaam TV

Uddhav Thackeray: आपण औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झाला आहात का? संजय राऊतांचा सवाल; उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर

Uddhav Thackeray Interview: पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांचा केक वाढदिवस साजरा करून त्यांचा केक खाणारी लोक मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत, असा उत्तर उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना दिलं.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी रोखठोक मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. 'निवडणुकांच्या महाभारतात नवे वादळ' असे कॅप्शन मुलाखतीला देण्यात आले.

Uddhav Thackeray Interview
Maharashtra Politics: लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार

सामना वृत्तपत्रासाठी घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उद्धव ठाकरेंना अनेक खडतर प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नाचं ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं. मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं.

"राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेससोबत जाऊन तुम्ही औरंगजेबाच्या विचाराने पुढे चालला आहात, अशी टीका भाजपकडून होतेय. खरंच तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झाला आहात का?" असा तिखट सवाल राऊतांनी ठाकरेंना विचारला.

यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांचा केक वाढदिवस साजरा करून त्यांचा केक खाणारी लोक मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत. औरंगजेब सुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता. जसे हे दिल्लीत गेले, तसे औरंगजेब हा आग्य्रात होता".

"औरंगजेब सुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी २७ वर्ष प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याने रोड-शो केले असतील, सभा घेतल्या असतील, याची कल्पना मला नाही. महाराष्ट्र जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब पुन्हा कधीच आग्राला जाऊ शकला नव्हता, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे", असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.

मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचं जे शौर्य गाजवलं, ते मराठे आणि त्यांचेच वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला.

Uddhav Thackeray Interview
Jalna lok sabha: कोण होणार जालन्याच्या खासदार? भाजपाचा विजयी रथ काँग्रेस रोखणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com