Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis SAAM TV

उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वैयक्तिक टीका करणारी जी भाषा वापरतात. ती कीव करण्यासारखी आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
Maharashtra Politics: भाजपकडून मला संपवण्याचा प्रयत्न, त्यांना केवळ मीच दिसतोय; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केले. उद्धव ठाकरे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्याने काही गोष्टी लक्षात आल्या तरी आम्ही त्यांना बोलायचो नाही, असं फडणवीस म्हणाले.

"बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आणि श्रद्धेपोटी आम्ही तसे वागायचो. खरे तर उद्धवजींना (Uddhav Thackeray) युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. १९९९ मध्येच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले", असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.

"भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. पण २०१९ मध्ये त्यांनी वेगळी आघाडी केली. मी मनापासून सांगतो की, आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो. बाळासाहेबांचे चिरंजीव कसे वागू शकतात यावर आमचा विश्वास होता. पण आमची चूक झाली", असंही फडणवीस म्हणाले.

"राज्यात युतीचं सरकार आणूनही मी मुख्यमंत्री झालो नाही, याचा मला धक्का बसला होता. नंतर लगेच मी विरोधी पक्षनेता या नात्याने काम करू लागलो. संकटे, आव्हाने येत असतात. पुढे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेण्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता. पक्षकार्यकर्ता म्हणून मी ते केले", असंही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
Uddhav Thackeray: आपण औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झाला आहात का? संजय राऊतांचा सवाल; उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com