satara bjp protest against congress leader nana patole. saam tv
महाराष्ट्र

Satara: 'नाना पटाेलेंनी 'तो मी नव्हेच' असा पळपुटेपणा करू नये'

राज्यभरात काॅंग्रेस नेते नाना पटालेंचा भाजप निषेध व्यक्त करीत आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : नाना पटोलेंचे (nana patole) वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे ,गांजाड्या नानांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आक्रमक होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी आज (साेमवार) पोवई नाका येथे नाना पटाेले यांचा निषेध नाेंदवत त्यांच्या छायाचित्रास जोडे मारले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांना उददेशून घाणेरडी टीका केली आहे. ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत. पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन सुरु आहे.

भाजपा (bjp) शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले नाना पटोले (nana patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे.

'तो मी नव्हेच' असा पळपुटेपणा करू नये

मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर 'तो मी नव्हेच' असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा त्यांनी दिला

महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जर राष्ट्राबद्दल प्रेम असेल ,पंतप्रधान पदा बद्दल त्यांच्या बद्दल त्याच्या मनात किंमत असेल तर त्यांनी नाना पटोले यांना ताबडतोब अटक करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नानांना त्यांची जागा दाखवतील आणि होणाऱ्या परिणामास महाविकास आघाडी जबाबदार असेल असा इशारा भाजपने दिला आहे.

यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी ,जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार ,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे,तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे,जिल्हा चिटणीस विजय गाढवे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले , तालुका सरचिटणीस गणेश पालखे,युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, आरोग्य सेवा जिल्हाध्यक्ष अप्पा कदम,सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके,वैशाली टंकसाळे, प्रशांत जोशी,चिटणीस रवी आपटे,महिला मोर्च्या शहराध्यक्ष रीना भणगे, तालुकाध्यक्ष मोनाली पवार, ओ बी सी युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार, शहराध्यक्ष मनीषा जाधव, युवा मोर्च्या शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, जेष्ठ नागरिक अध्यक्ष प्रकाशकाका शहाणे, ओ बी सी शहर उपाध्यक्ष अविनाश खार्शिकर, किरण माने , पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT