Satara Yavateshwar Ghat Accident Saamtv
महाराष्ट्र

Satara Car Accident: वडिलांचे अपघाती निधन, लेकीवरही काळाचा घाला.. यवतेश्वर घाटात भीषण अपघात; एक युवती ठार, ४ जखमी

Yavateshwar Ghat Accident: अपघातात मृत पावलेली गायत्री आहेरराव ही दीड वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेत कामास होती.

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी...

Satara Accident News: सातारा शहराजवळील यवतेश्वर घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. होंडा सिटी आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर धडक होवून हा अपघात झाला. यामध्ये एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. (Satara Latest News)

दोन गाड्यांची समोरासमोर धडक...

समोर आलेल्या माहितीनुसार, सातारा (Satara) शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात (Accident) झाला. क्रेटा आणि होंडा सिटी कारची समोरासमोर धडक होवून चार ते पाचजण जखमी झाले आहेत, तर गायत्री आहेरराव (Gayatri Aherrao) या २१ वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. अपघात जखमी झालेल्या सर्वांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी हलवले. उपस्थितांकडून अपघातग्रस्त वाहने बाजुला करून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.

वडिलांचेही अपघाती निधन, लेकीवरही काळाचा घाला...

दरम्यान, अपघातात मृत पावलेली गायत्री आहेरराव ही दीड वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेत कामास होती. दुर्देवी बाब म्हणजे सातारा नगरपालिकेचे कर्मचारी असलेले तिचे वडील दिपक आहेरराव हे देखील काही वर्षांपूर्वी अपघातामध्ये मृत पावले होते. वडिलांनंतर लेकीवरही काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT