Satara, Satara Crime News, Bribe, Satara Police Saam Tv
महाराष्ट्र

Satara News : पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा एसीबीनं लिपिकास पकडलं

त्यांच्या विराेधात एसीबीनं शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

साम न्यूज नेटवर्क

Satara Crime News : लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं (acb) शहरातील (satara) एका कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना प्रमुख लिपिकास रंगेहाथ पकडलं आहे. संबंधितावर पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे अशी माहिती एसीबीच्या अधिका-यांनी दिली.

नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक शामराव शंकर बांदल (वय ५२ राहणार रामकुंड, पुष्प ज्योतिबा अपार्टमेंट, सातारा) यास एसीबीनं शुक्रवारी सायंकाळी पकडलं.

नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी प्रमुख लिपिक शामराव बांदल यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडं तक्रार नाेंदवली. त्यानंतर त्याबाबतची पडताळणी २५ ऑगस्टला करण्यात आली. संबंधित तक्रारीत तथ्य आढळले.

त्यानंतर एसीबीनं शुक्रवारी (ता. २६) सातारा येथील नगर भुमापन कार्यालयात सापळा लावला. शामराव बांदल हे तक्रादाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडले. त्यांच्या विराेधात एसीबीनं शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक काटकर, पोलीस कॉन्स्टेबल येवले, भोसले यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

SCROLL FOR NEXT