crime news
crime newssaam tv

Sangli: नवऱ्याच्या 'त्या' कृत्यावर निराश झालेल्या बायकाेनं केली आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरटे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
Published on

सांगली - पतीने मोबाईलचे लॉक उघडून दिल्याने निराश झालेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरटे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. काल सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस (Police) ठाण्यात शिवाजी खोत यांनी फिर्याद दिली आहे.

हे देखील पाहा -

शिरटे येथे सामान्य कुटुंबातील भगवान खोत हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अल्प शेती असल्याने भगवान खोत साखर कारखान्यात नोकरी आणि शेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. काल सकाळी भगवान यांचा मोबाइल पत्नीने घेतला. त्याचा लॉक काढून द्या असा हट्ट पत्नी भगवान यांच्याकडे करू लागली.

crime news
Crime News : अपहरण झालेल्या बालकाची रेल्वेतून सुटका; साता-यात चाैघांना अटक

परंतु भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाइल लॉक काढून दिला नाही त्यामुळे पत्नी निराश झाली आणि चहा नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन पत्नीने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपस पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com