महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये सापडले 19 महत्त्वाचे पुरावे

Santosh Deshmukh Case: सरपंच देशमुख हत्या प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडीला एकाच कारमधून १९ पुरावे मिळाली आहेत.

Bharat Jadhav

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन खुलासे होत असताना या हत्या प्रकरणी नवीन मोठी बातमी हाती आलीय. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून केला जात असून याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रासह अनेक पुरावे सीआयडीने जोडले आहेत. यात सीआयडीला एकाच कारमधून तब्बल १९ महत्त्त्वाचे पुरावे सापडली होती.

या प्रकरणाचा तपास करताना सीआयडीला आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार महत्त्वाची ठरली आहे. सरपंच देशमुख याचे अपहरण करताना आरोपींनी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारचा उपयोग केला होता. याच कारमधून सीआयडीला अनेक पुरावे सापडले आहेत.

सीआयडीला कारमध्ये काय- काय सापडलं?

रंगाचे जॅकेट

दोन गॉगल्स

तीन मोबाईल

सहा आरसी बुक

एटीएम कार्ड,

पॅनकार्ड

41 लांबीचा पाईप

क्लच वायर लावलेला पाईप

डाग असलेला सीट कव्हर

सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी ठरली महत्त्वाची

आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडले व्हिडिओ आढळून आला.

काळ्या काचाचे दोन गॉगल्स

सुदर्शन घुले चे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेटही स्कार्पिओ गाडीत सापडले.

सहा आरसी बुक सापडले

सुदर्शन घुलचे,एटीएम कार्ड, pan कार्ड, 41 लांबीचा पाईप

लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार

रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर तुकडा.

यासह सीआयडीला मारहाणीसाठी वापरण्यात आलेला पाईप देखील सापडलाय. या पाईपचे तुकडे सीआयडीच्या हाती लागले आहेत. संतोष देशमुख यांना मारहाण करताना पाईपचा वापर करण्यात आला होता. मारहाण करतेवेळी या पाईपचे तुकडे झाले होते. आता अखेर या पाईपचे १५ तुकडे सीआयडीने जप्त केलेत. या पाईपच्या १५ तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा ढोबळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

Gas Cleaning : 10 मिनिटांत गॅसवरील तेलकट डाग घालवा, वाचा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: सांगलीतील शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बाग काढून टाकली

Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजू-सलमानची जोडी; साकारणार 'ही' खास भूमिका

Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT