nitesh rane Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane Bail Granted: संताेष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना जामीन मंजूर

भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर मंगळवारी झालेली सुनावणी प्रसंगी त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे न्यायालयात उपस्थित हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या (sindhudurg dcc bank) निवडणुकीपुर्वी हल्ला झाला हाेता. या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत. त्यांच्या तब्येत ढासळल्याने त्यांच्यावर काेल्हापूरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान नितेश राणेंनी दाखल केलेला नियमीत जामीन अर्ज आज (बुधवार) मंजूर झाला आहे. (nitesh rane bail granted)

मंगळवारी राणेंच्या जामीन अर्जावर येथील जिल्हा सत्र न्यायालयात (court) सुनावणी झाली. दाेन्ही बाजूंच्या वकीलांनी जाेरदार युक्तीवाद केला. आज (बुधवार) प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी ३० हजाराच्या जात मुचलक्यावर राणेंचा जामीन मंजूर केला.

या सुनावणी दरम्यान दाेन्ही बाजूच्या वकीलांनी त्यांचे मुद्दे न्यायालया पुढं जाेरदार मांडले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने प्रदीप घरत आणि भुषण साळवी यांनी कामकाज पाहिले. नितेश राणेंच्या (nitesh rane) बाजूने संग्राम देसाई आणि सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली.

दरम्यान आज नितेश राणेंचा नियमीत जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी ३० हजाराच्या जात मुचलक्यावर राणेंचा जामीन मंजूर केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा ZP मध्ये पवारांना धक्का, २ दिग्गजांसह सरपंचाने साथ सोडली, शिवसेनेत केला प्रवेश

Prajakta Mali Diet Plan: अभिनेत्री प्राजक्ता माळीसारखं फिट राहचय? आजपासून बदल्या या 4 सोप्या सवयी

Ratnagiri Tourism : ट्रेकिंगसाठी साधं-सोप लोकेशन शोधताय? रत्नागिरीत आहे बेस्ट ठिकाण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे लोकलने चर्चगेटला रवाना

The Taj Story: ताजमहाल मंदिराच्या जागी बांधलाय? परेश रावल यांच्या चित्रपटातील कथा कल्पनिक की सत्य!

SCROLL FOR NEXT