Santosh Deshmukh Case Updates Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेचं लोकेशन सापडलं, नाशिकमधील फोटो व्हायरल? नेमकं सत्य काय?

Santosh Deshmukh murder case, Krushna Andhale : फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. नाशिक पोलिसांकडून तात्काळ तपास करत याचा शोध घेण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

Namdeo Kumbhar

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेला कृष्णा आंधळे याचं लोकेशन सापडल्याची चर्चा आहे. कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दबा धरून बसल्याची चर्चा आहे. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करूण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बीडमधील वातावरण तापले, लोकांनी मोर्चे आंदोलन काढली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणातील आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा आंधळे पोलीस आणि एसआयटीला गुंगारा देतोय, पण आता तो नाशिकमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर कृष्णा आंधळेचे नाशिकमधील फोटो व्हायरल झाले आहेत. नाशिकच्या नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय.

संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याच्या अफवा उडाल्यानंतर नाशिक पोलीस तात्काळ ॲक्शन मोडवर आले आहेत. मुक्तिधाम मंदिर परिसरात उपनगर पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची तसेच लॉजिंग रेकॉर्डची पोलिसांनी पडताळणी केली.

संतोष देशमुख हत्येतील संशयित आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. नाशिक उपनगर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन करून माहिती घेतली आहे. सोशल मीडियावर फिरणारे फोटो कृष्णा आंधळेचे नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले, पण तपास अद्याप सुरूच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, टोळीकडून लोखंडी रॉडने मारहाण; धाराशिवमध्ये खळबळ, CCTV व्हिडिओ चर्चेत

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

Mirchi Bhaji: कुरकुरीत अन् झणझणीत मिरची भजी बनवण्याची सोपी ट्रिक;लगेच करा ट्राय

Liver Failure: कमी झोप अन् सतत थकवा जाणवतोय? असू शकतात लिव्हर फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Honymoon Destination: हिवाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

SCROLL FOR NEXT