Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मात्र हे दोघे तब्बल २५ दिवस कोणत्या बिळात लपले होते याचा चौकशीदरम्यान पर्दाफाश झालाय. यात या आरोपींचं गुजरात कनेक्शन पुढं आलंय. मुख्य आरोपी असलेल्या सांगळे आणि घुले यांच्या अटकेची नेमकी इनसाईड स्टोरी काय आहे पाहूयात.
घुले, सांगळेच्या अटकेची इनसाईड स्टोरी
- संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपी गुजरातला पसार
- गुजरातमध्ये एका शिवमंदिरात १५ दिवस वास्तव्य
- १ जानेवारीपर्यंत आरोपींकडचे सर्व पैसे संपले
- कृष्णा आंधळेला पैसे घेण्यासाठी पुण्यात पाठवलं
- संपर्क न झाल्याने सुदर्शन घुले, सुधीर सांगळेही मुंबईमार्गे पुण्यात आले
- पोलीस चौकशीत डॉ. संभाजी वायभासेने ठावठिकाणा सांगितला
- सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या; कृष्णा आंधळे मात्र फरार
मात्र या प्रकरणात ज्या डॉक्टर संभाजी वायभासेमुळे आरोपींचा ठावठिकाणा लागला? त्या संभाजी वायभासेचा या प्रकरणात नेमका रोल काय? पाहूयात.
- डॉ. संभाजी वायभासेचा रोल काय?
- डॉ. संभाजी वायभासे आणि सुरेखा वायभासे धारुर तालुक्यातील रहिवासी
- वायभासे डॉक्टरकीसोबत ऊसतोड कामगारांचा मुकादमही आहे
- एखादा कामगार पळून गेला तर सुदर्शन घुले कामगाराकडून वसुलीचं काम करायचा
- घटनेनंतर घुलेने वायभासेला संपर्क केला आणि आरोपींचा ठिकाणा लागला
- पोलीसांनी तांत्रिक बाबी तपासून घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळल्या
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या ७ पैकी ६ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर देशमुख यांचा गाववाला असलेला आणि आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर वाल्मिक कराडलाही खंडणी प्रकरणात 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावलीय... त्यामुळे बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेली एसआयटी सातवा आरोपी कृष्णा आंधळेला कधी जेरबंद करणार? आणि संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.