beed santosh deshmukh case Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Murder Photo : मोठी बातमी! राज्याला हादरवणारं हत्याकांड, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर

Santosh Deshmukh Case : राज्याला हादरवणारं हत्याकांड असलेल्या संतोष देशमुख प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या हत्याकांडातील आरोपींचेही फोटो समोर आले आहेत .

Vishal Gangurde

संतोष देशमुख प्रकरणाची मोठी अपडेट हाती आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ, फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे हेच क्रूर फोटो समोर आले आहेत. या फोटोनंतर एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांची लोखंडी रॉडने मारून हत्या केल्याचे उघड झाले आहे. देशमुख यांच्या हत्येचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो हाती आले आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचेही फोटो समोर आले आहेत.

बीडच्या मस्साजोगचं सरंपच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे पुरावे 'साम'च्या हाती आले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. देशमुखांची निर्घृण हत्या केल्यानंतर विकृतांनी एकच उन्माद केल्याचं समोर आलं आहे.

हत्येवेळी नेमकं काय घडलं?

सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिंसेबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केल्यानंतर त्यांना एका ठिकाणी नेलं. देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता. मारहाणीचा व्हिडिओ कृष्णा आंधळेने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता. 'मोकारपंती' असे या व्हॉट्सअॅप ग्रुपचं नाव होते. या ग्रुपमधील पाच ते सहा जणांनी देशमुखांना होणारी मारहाण पाहिली. या ग्रुपमधील सर्व फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने आरोपी केदारच्या फोनमधून जप्त केले.

फोटोमध्ये आरोपी सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांना माराहण करत असल्याचे स्पष्टपण दिसत आहे. यावेळी संतोष देशमुख यांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. देशमुखांचे कपडे काढून कशी वागणूक दिली, अत्याचार केला, हे देखील फोटोमध्ये दिसत आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करताना सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी सुधीर सांगळे, प्रतिक घुले हे हसत आहेत. या तिघांच्या मारहाणीतच संतोष देशमुख यांचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT