Walmik Karad  Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! मास्टरमाईंड कराडची अचानक प्रकृती बिघडली, तुरूंगातून थेट रूग्णालयात, नेमकं झालं काय?

Walmik Karad latest news : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची तुरुंगात अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद बीड प्रतिनिधी

Walmik Karad health update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची प्रकृती बिघडल्याचे समोर आली आहे. उपचारासाठी कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. तुरूंगात आरोपी वाल्मीक कराडला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून आरोपी वाल्मीक कराडच्या चाचण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच त्याला नेमकं काय झालं, हे स्पष्ट होणार आहे. (Walmik Karad hospitalised Beed latest news)

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता दीड वर्ष पूर्ण झाले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत. त्यापैकी विष्णू चाटे हा लातूर कारागृहात, तर उर्वरित आरोपी बीड जिल्हा कारागृहात आहेत. बीड तरूंगात असलेल्या वाल्मिक कराड याची अचानक प्रकृती बिघडली.

यापूर्वी याच प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा त्याच्या भावाच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी एक दिवसाकरिता कारागृहाबाहेर आला होता. मात्र, आता या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड वाल्मीक कराडची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. जिल्हा कारागृहात अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी वाल्मीक कराडवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झाले असून, त्याच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला उपचारासाठी आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. कारागृहात त्याची प्रकृती अचानक का बिघडली किंवा त्याला नेमके काय झाले, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नाशिक धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे मुंब्रापर्यंत

Phone Battery Damage: फास्ट चार्जिंग होणाऱ्या फोनची बॅटरी लगेच खराब होते का? वाचा सत्य

Shocking : नवरा नाईट ड्युटीवर, घरी सासऱ्याकडून सुनेचा लैंगिक छळ ; खुलताबादमधील धक्कादायक घटना

BJP Leader Killing Case : भाजप नेत्याची हत्या; काँग्रेस आमदाराला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT