महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : सुदर्शन घुलेचे पाय आणखी खोलात, पोलीस कोठडीत वाढ; मोबाईल डेटावरून उलगडणार सत्य

Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी घुले न्यायालयीन कोठडीत होता, परंतु आता त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

Dhanshri Shintre

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले आणखी अडचणीत सापडला आहे. न्यायालयाने घुलेला ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी तो न्यायालयीन कोठडीत होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना १८ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तपासासाठी आवश्यक शर्तींवर त्यांना पुन्हा पोलिस कोठडी देण्याऐवजी न्यायालयीन कोठडीत पाठवले. तपासात कोणताही नवीन मुद्दा समोर आलेला नाही.

तपास अधिकारी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी मांडलेले मुद्दे

- संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईलमधील डाटा तपासामध्ये हस्तगत करण्यात आला आहे आणि याच डाटा संदर्भात चौकशी करण्यासाठी सुदर्शन घुले याची पोलीस कस्टडी हवी आहे.

- यासोबतच एक दुसरा मोबाईल जो सुदर्शन घुले याचा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या मोबाईलचे लॉक अद्याप उघडलेले नाही आणि तेही उघडायचे आहे. त्याचा तपास करायचा आहे.

आरोपी वकील अनंत तिडके यांचा युक्तिवाद

यापूर्वीच तपास करत असताना जो डिजिटल इव्हिडन्स पोलिसांच्या हाती लागला आणि त्यातून असं सांगण्यात आलं की आरोपीच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती अथवा पश्चाताप पाहायला मिळाला नाही. जर ही माहिती १४ दिवसांपूर्वीच पोलिसांकडे होती तर मग आता कोणता मोबाईल त्यांना ओपन करायचा आहे असा प्रति प्रश्न आरोपीचे वकील अनंत तिडके यांनी विचारला.

यासोबतच ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या काही तासानंतरच पोलिसांनी जे वाहन ताब्यात घेतलं त्यातच मोबाईल आढळून आले होते. मग इतक्या दिवस हे मोबाईल जर पोलिसांच्या ताब्यात आहेत तर तो तपास आतापर्यंत का झाला नाही? असा प्रश्न सुद्धा यावेळी आरोपीच्या वकिलाने विचारला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकत आरोपी सुदर्शन घुले याला ३१ जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT