Suresh Dhas Statement : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर सीआयडीने हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पुण्यात बेड्या ठोकल्या. तर सिद्धार्थ सोनावणेला कल्याणमधून अटक केली. दरम्यान संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ आज पुण्यात सर्वपक्षीयांकडून जनआक्रोश मोर्चा निघाला. या मोर्च्यामध्ये आमदार सुरेश धस सहभागी झाली होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना खंडणीप्रकरणासंदर्भात धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा कट आठ महिन्यांपासून रचला जात असल्याचे सांगत संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
पुण्यातील जनआक्रोश मोर्च्यामध्ये आमदार सुरेश धस यांनी अनेक खुलासे केले. त्यांनी वाल्मीक कराडने ज्या खंडणी प्रकरणात आत्मसमर्पण केले, त्याचा एकूण घटनाक्रम सांगितला. सुरेश धस म्हणाले, "१४ जून रोजी परळीत धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर पवनचक्कीशी संबंधित कंपनीच्या मॅनेजरसह वाल्मीक कराडची बैठक झाली. यात नितीनदेखील उपस्थित होता. धनजंय मुंडे यांचा जोशी नावाचा पीए आहे. त्याच्याशी संपर्क साधत धनजंय मुंडे यांचा संपर्क होतो का याचा कंपनीचे वरिष्ठ प्रयत्न करत होते. दरम्यान वाल्मीक कराडची सटकली."
ते पुढे म्हणाले, "धनजंय मुंडे यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये ३ कोटी रुपयांची डील फायनल झाली. निवडणुकीच्या काळात ५० लाख रुपये आका आणि बडे आकांना दिले गेले. हे सगळे पुरावे आहेत. आता अजून काय पुरावे देऊ सांगा?"
"वाल्मीक अण्णा ऊर्फ आका १७ मोबाईल नंबर वापरतात. नितीन कुलकर्णी आणि वाल्मीक कराड दोघे मिळून १७ मोबाईल वापरतात. नितीन कुलकर्णीला समोर आणा अशी मी पोलीस निरीक्षक आणि सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक यांना विनंती आहे. कुणाकडे किती माल आहे याचे सगळे पुरावे या १७ मोबाईलमध्ये सापडतील", असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.