Pankaja munde dhananjay munde valmik karad Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : "जो कुणीही दोषी..", संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या? वाचा

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी कुणाचेही नाव घेणे टाळले.

Yash Shirke

Santosh Deshmukh Case : पंकजा मुंडे यांनी डिसेंबर महिन्यात पर्यावरण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी आज (७ जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी बोलताना त्यांनी विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. याच दरम्यान त्यांनी बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी बोलताना धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे नाव घेणे टाळले.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. यामध्ये कथित स्वरुपात धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जात आहे. तर खंडणी प्रकरणात आत्मसमर्पण करणारा वाल्मीक कराड हा हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना काही प्रश्न विचारण्यात आले.

प्रश्नांची उत्तरे देताना पंकजा मुंडे यांनी 'संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीद्वारे चौकशी केली जावी यासाठी मी सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. या विषयावर व्यक्त न होण्यामागचं काही कारण नाही. हत्याप्रकरणात कुणीही सहभागी असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तेव्हा सारखं तोच विषय चालू ठेवणं योग्य नाही. यावर सतत बोलल्याचा मुख्यमंत्र्यांवर, यंत्रणेवर विश्वास नाही, असा अर्थ होतो', असे विधान केले.

पंकजा मुंडे यांनी 'या प्रकरणात कोण कोण दोषी आहे, हे मला ठाऊक नाही. त्यामुळे मी कुणाच नाव घेणार नाही. जो दोषी असेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे', असे म्हणताना त्यांनी धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांचे नाव घेणे टाळले आहे. दरम्यान या प्रकरणामुळे बीडचे पालकमंत्रीपद पंकजा मुंडे किंवा अजित पवार यांच्याकडे जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

Coolie VS War 2: रविवारी 'कुली'चा बोलबाला, 'वॉर २'ला पछाडले; चौथ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

SCROLL FOR NEXT