बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच आता मुंबईत देखील या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटनेकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.
बीडच्या केजमधील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची एक महिन्यापूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्याचे पडसाद आता मुंबईत देखील उमटताना दिसत आहे. मुंबईच्या आझाद मैदानवर आज सरपंच संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनातून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्यात यावी, त्याचबरोबर ५० लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.