Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणी मोठी अपडेट; पवनचक्की अधिकाऱ्यांना २ कोटींची खंडणी कोणी मागितली? माहिती समोर येणार

Santosh Deshmukh Case News in Marathi : संतोष देशमुख प्रकरणी मोठी अपडेट हाती आलीये. पवनचक्की अधिकाऱ्यांना २ कोटींची खंडणी कोणी मागितली, यासाठी व्हॉईस सँपल तपासले जाणार आहेत.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : संतोष देशमुख प्रकरणात महत्वाची अपडेट हाती आली आह. बीडमधील पवनचक्की प्रकल्प चालकाकडून २ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सुदर्शन घुलेचे व्हॉईस सँपल तपासले जाणार आहेत. यासाठी केजच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सुदर्शन घुले सध्या केजच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे.

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याची सीआयडीने खंडणी प्रकरणात कस्टडी घेतली आहे. संतोष देशमुख प्रकरणाला पूरक खंडणी प्रकरणाचा गुन्हा आहे. या खंडणी प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन घुले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकरणात अद्याप सुदर्शन घुले याची चौकशी झाली नव्हती. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेला पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आले आहे.

खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आधीच वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेची चौकशी झाली आहे. मात्र सुदर्शन घुलेची चौकशी होणे बाकी होते. या पोलीस कस्टडीमध्ये सुदर्शन घुलेचे व्हाईस सॅम्पल घेतले जाणार आहे. सध्या सुदर्शन घुलेला केज शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सुदर्शन घुलेच्या व्हॉईस सॅम्पल घेतल्यानंतर खंडणी कोणी मागितली, हे स्पष्ट होणार आहे.

घुलेला दोन दिवसांची कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सीआयडीने सुदर्शन घुलेची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर केज न्यायालयाने सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

केज येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी प्रकरणी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींवर केजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपी सुदर्शन घुलेला सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलीये. संतोष देशमुख खंडणी प्रकरणातही सीआयडीकडून सुदर्शन घुलेची चौकशी आणि तपास केला जातो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT