Santosh Desshmukh Murder Case
Santosh Desshmukh Murder CaseSaamTv

Sudarshan Ghule : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी घुलेच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर, सत्य समोर येणार?

Sudarshan Ghule Mobile Phone Data Recover : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर झाला आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
Published on

बीड : दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर झाला आहे, अशी माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच विष्णू साठे याच्या मोबाईलमधील डेटा देखील सीआयडीने शोधला आहे. त्यामध्ये महत्त्वाची माहिती आहे. तपासात काही गोपनीयता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाही. मात्र, तपास समाधानकारक सुरू आहे, असं मतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.

संतोष आण्णा देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडसर ठरत असतील त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी ही अशी विनंती धनंजय देशमुखांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर दिलेली आहे. धनंजय देशमुख यांनी केज येथील शासकीय विश्रामगृहावर CIDचे अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली तेव्हा या तपासाच्या अनुषंगाने चर्चा झाली, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.

Santosh Desshmukh Murder Case
करुणा शर्मांबद्दल अंजली दमानियांना वेगळीच भीती, मुंडेंचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा दिल्यानंतर म्हणाल्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com