Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मानवाधिकार आयोगामध्ये गुन्हा दाखल

MP Bajrang Sonawane : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली होती. चौकशीला लवकरच सुरुवात होणार आहे.

Yash Shirke

Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणाला काल एक महिना पूर्ण झाला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानूगनो यांची भेट देखील घेतली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने करावी अशी मागणी सोनावणे यांनी केली आहे. आयोगाने गुन्हा दाखल करुन चौकशीला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मस्साजोग प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात गुन्हा क्र. ३३/१३/५/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला आहे, अशी माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी माध्यमांना दिली आहे. दिल्लीहून बीडमध्ये आयोगाची टीम येणार आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा अहवाल मागवून मग तपास सुरु केला जाईल असे म्हटले जात आहे.

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. अनेक जागी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे. आज (१० जानेवारी) जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीन महाजनआक्रोश मोर्चा निघाला. दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT