Santosh Deshmukh Case At Delhi Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे थेट दिल्लीत पडसाद, साहित्य संमेलनात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

Santosh Deshmukh Case At Delhi : दिल्लीत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या साहित्य संमेलनामध्ये या प्रकरणावरुन खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Santosh Deshmukh Case Marathi Sahitya Samelan : दिल्लीमध्ये सध्या अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरु आहे. दरम्यान संमेलनादरम्यान मराठवाडा ठराववरुन महामंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद थेट दिल्लीमध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पडत आहेत.

सोमनाथ सुर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यू, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाचे पडसाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेने या संदर्भात मांडलेल्या ठरावावरुन साहित्य मंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. महामंडळ हा ठराव स्विकारुन समारोपाच्या वेळी मांडणार का हे उद्या स्पष्ट होणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेने ठरावात अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भष्ट्राचाराचा उल्लेख ठरावात केला. मुंडे यांचे नाव न घेता मंत्र्याचा भष्ट्राचार, मंत्र्यांच्या हस्तकांची खंडणखोरी असे म्हटले. संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू या दोन्ही धक्कादायक घटनांची दखल घेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान यांनी भूमिका घ्यावी यासाठी हा ठराव मांडण्यात आला आहे. महामंडळाने हा ठराव स्विकारण्यासाठी अनुकुलता दर्शवली नसल्याची माहिती समोर आली आहे.

'आपण साहित्यिकांनी सामाजिक, राजकीय विषयावर बोलायला नको', अशी भूमिका साहित्य महामंडळाने मांडली. मात्र 'जर आणीबाणीविरोधी ठराव मांडणाऱ्या दुर्गाबाई भागवतांची परंपरा आपण सांगत असू, तर आपण सामाजिक, राजकीय विषयावर भूमिका घेतली पाहिजे. जर राजकीय नेते संमेलनात येत असतील, जर आपण सामाजिक-राजकीय विषयांवर परीसंवाद संमेलनात घेणार असू, तर संवेदनशील प्रश्नांवरही साहित्यिक म्हणून आपण भूमिका घेतली पाहिजे', असे मराठवाडा साहित्य परिषदेचे म्हणणं आहे. दरम्यान हा ठराव महामंडळ स्विकारणार की नाही हे उद्याच कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील शाळांना उद्या सुट्टी

Woman Police : दारुच्या नशेत रिक्षाचालकाची मग्रुरी, महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, VIDEO

YouTube Earning: तुम्हाला व्हिडीओ दाखवणारा यूट्यूब किती कमाई करतो?

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

SCROLL FOR NEXT