Walmik Karad  Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच, SIT कडून आलिशान कार जप्त

Walmik Karad : वाल्मीक कराडच्या कार जप्त करण्यात आल्यामुळे कोट्यावधी रुपयांची जमवलेली संपत्ती त्याला गमावावी लागणार आहे. वाल्मीक कराडच्या आलिशान कार एसआयटीने जप्त केल्या आहेत.

Priya More

योगेश काशीद, बीड

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मीक कराडच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वाल्मीक कराडच्या महागड्या कार आता एसआयटीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराडच्या नावावर असलेल्या काही आलिशान आणि महागड्या कार जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाल्मीक कराडच्या कार जप्त करण्यात आल्यामुळे कोट्यावधी रुपयांची जमवलेली संपत्ती त्याला गमावावी लागणार आहे. वाल्मीक कराडची महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे प्लॅट, रो हाऊस त्याचबरोबर जमीन आणि मोठ मोठी महागडी वाहन यांचा समावेश आहे. वाल्मीक कराडच्या नावावर आणि त्याच्या काही नातेवाईकांच्या नावावर या संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

वाल्मीक कराडच्या जप्त करण्यात आलेल्या कार -

- मर्सिडीज बेन्झ MH44z0007

- बीएमडब्ल्यू Mh44Ac1717

- इनोव्हा टोयोटा, Mh44AB1717

- फोर्ड इंडेवर Mh44T0777

- अशोक लेलँड Mh44 u7700

दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. वाल्मीक कराडने आयफोनमधील डिलीट केलेला डेटा एसआयटीने रिकव्हर केला आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी टीमकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

'पोलिसांनी गळा दाबला, प्रायव्हेट पार्टवर मारलं'; दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अमानुष मारहाणीची आपबिती

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या उमरग्यात थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढले

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT