Sarpanch Santosh Deshmukh Case: बीड बंद! १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी',सरकारचा आदेश

Beed Bandh : अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी १७ मार्चपर्यंत बीडमध्ये मनाई हुकूम जारी केलाय. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे.
Sarpanch Santosh Deshmukh Case: बीड बंद! १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी',सरकारचा आदेश
Published On

मराठा-ओबीसी आरक्षण वाद, संतोष देशमुख हत्याकांड यामुळे गेल्या काही महिन्यापासून बीड चर्चेत आहे. गुन्हेगारी, राजकीय मोर्चे आणि त्यात दोन समाजात असलेला तणाव पाहता बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. संतोष देशमुख हत्याकांडाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीडमध्ये अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मनाई हुकूम जारी केलाय.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहेत. यासह इतर बाबींमुळे अचानक घडणाऱ्या घटनांवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ३ ते १७ मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केलाय. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिलीय.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रशासनाने ही खबरदारी घेतलीय. दुसरीकडे राज्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होतेय. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी सरकारवर दबाव वाढलाय. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा असे निर्देश देवेंद्र फडवणवीस यांनी दिलेत.

Sarpanch Santosh Deshmukh Case: बीड बंद! १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी',सरकारचा आदेश
Rohit Pawar: थोरले मुंडे साहेब असते तर चाबकाने मारलं असतं अन्..., रोहित पवारांचा हल्लाबोल

'या' सर्व गोष्टींवर असणार बंदी

महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३) अन्वये काढणाऱ्या आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलन, धरणे आंदोलन यासारख्या ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील.

शस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगता येणार नाही. काठ्या लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, ते सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत.

Sarpanch Santosh Deshmukh Case: बीड बंद! १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी',सरकारचा आदेश
Tanaji Sawant: तानाजी सावंतांसाठी 'सागर'चे गेट बंद; मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली?

कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटके बाळगता येणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे फोडायची किंवा फेकायची उपकरणे साधे गोळा करून ठेवता येणार नाहीत.

आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबानात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येणार तसेच अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत.

घोषणा देणे, गाणी म्हणणं, वाद्य वाजवणे, कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरूद्ध असेल किंवा देशाचा मान, सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल तर ते कृत्य करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com