Sanjog Waghere Saam
महाराष्ट्र

Thackeray Group: पिंपरी चिंडवडमध्ये अजित पवार गटाला खिंडार; माजी महापौरांसह शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात

Pimpri - Chinchwad News: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मावळ लोकसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का देत संजोग वाघेरे यांचं पक्षप्रवेश घडवून आणला.

Bharat Jadhav

(गोपाल मोटघरे )

Sanjog Waghere Joins Uddhav Thackeray Group :

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा खिंडार पडलं. अजित पवार गटाचे एक मोठे पदाधिकारी संजोग वाघेरे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अजित पवार गटाला झटका दिल्याचं म्हटलं जातंय. संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून शिवबंधन बांधणार असले तरी यावेळी पक्ष सोडत असताना वाईट वाटत असल्यास म्हणत ते भावनिक झाल्याचे बघायला मिळाले. (Latest News)

लोकसभा निवडणुका (Lok Sabha election) जाहीर होण्याआधीच शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) मावळ (Maval) लोकसभा क्षेत्रात ( Lok Sabha Constituency) शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) अजित पवार गटाला (Ajit Pawar group) मोठा धक्का देत संजोग वाघेरे यांचं पक्षप्रवेश घडवून आणला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित असल्याचे बोलल जात आहे. यामुळे मावळ लोकसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीचा सामना होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मावळ लोकसभा क्षेत्रात सध्या शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. मावळ लोकसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात निवडणुकीचा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मावळ लोकसभा २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत माझ्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे? हे मी कधीही पाहला नाही मावळ लोकसभा क्षेत्रात मी केलेल्या कामावर मला मावळची जनता पुन्हा एकदा निवडून देईल, असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय.

त्याचबरोबर महायुतीत मावळ लोकसभा क्षेत्राची जागा कुणाला जाईल ? याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुद्धातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्यामुळे मावळचा आगामी खासदार म्हणून मी पुन्हा निवडून येईल, असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय.

दुसरीकडे मावळमधून पार्थ पवार यांना तिकीट घेण्यासाठी पार्थ पवार इच्छुक असल्याचं बोललं जातं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला होता. तरीही अजित पवार आणि त्यांच्या गटातील काही पदाधिकाऱ्यांना मावळ लोकसभा क्षेत्रात पार्थ पवारांना उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT