रुपाली बडवे, मुंबई|ता. ३० डिसेंबर २०२३
एकीकडे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना राजकीय वातावरणही तापल्याचे पाहायला मिळत आहे. उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन सुरू झालेला वाद आता राममंदिर निर्मितीच्या श्रेयवादापर्यंत येऊन पोहोचला आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणालेत उद्धव ठाकरे?
"राम मंदीर हा अस्मितेचा विषय आहे. तो राजकीय इव्हेंट होऊ नये.. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच उद्घाटन सोहळ्याला जाण्यासाठी मला कोणाच्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही. मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी अयोध्येला गेलो आणि मुख्यमंत्री झाल्यावरही गेलो. त्यासाठी कोणत्या मुहूर्ताची गरज नाही.." असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटपावरही भाष्य केले. "राष्ट्रवादीसोबत आमची बोलणी झालेली आहेत. कॉंग्रेस बाबत अद्याप वरिष्ठांकडून निरोप आलेला नाही. आम्ही मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या २ दिवसात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीची बैठक होईल," असे ठाकरे म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पिंपरी चिंचवडमधील अजितदादा गटाचे (Ajit Pawa) बडे नेते संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी बोलताना "शिवसेनेच्या वाघांचे स्वागत. मला भेटल्यावर तुम्ही भाऊक झालात. आता मला भाऊक आणि घाऊक यांच्यातला फरक कळाला.." असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.