Sanjay Shirsat vs Sanjay Raut  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: राऊतांच्या नाकावर टिचून आम्ही उठाव केला; संजय शिरसाट यांची टीका

Sanjay Shirsat vs Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या संजय राऊत यांनी टीकेला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. खोटं बोलण्याची स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये राहिली असती तर पंतप्रधान मोदींचा विजय झाला असता अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

Bharat Jadhav

(RNO)

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री शिंदे यांच्या संजय राऊतांनी केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांच्या टिकेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. स्वाभिमान नावाची गोष्ट यांच्याकडे राहिलेली नाहीये. संजय राऊत यांच्या नाकावर टिचून स्वाभिमानाने आम्ही उठाव केला होता, असं शिंदे गट शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणालेत. (Latest News)

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेनेत उठाव का केला याचंही त्यांनी परत एक कारण सांगितलं. संजय राऊत यांना स्वाभिमान राहिलेला नाहीये. आम्ही स्वाभिमान टिकवण्यासाठी शिवसेनेत उठाव केला. त्यांच्या नाकावर टिचून हा उठाव केला असं शिरसाट म्हणालेत. शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असणारा उठाव आम्ही केला ही आमच्यात असणारी हिंमत आहे. संजय राऊतला त्याची जागा दाखल्याशिवाय लोकं शांत बसणार नाहीत आणि त्याचा तोटा उबाठा गटाला होणार असल्याचा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय.

पंतप्रधान कसा असावा तर मोदींसारखा असावा

खोटं बोलण्याची स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये राहिली असती तर पंतप्रधान मोदींचा विजय झाला असता अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. संजय राऊत यांचे सर्व बाईट्स काढून बघा पंतप्रधान मोदींविषयी त्यांची दरवेळेला स्टेटमेंट बदलेली आहेत. नरेंद्र मोदी यांना देशातच नव्हे तर जगामध्ये एक मानाचे स्थान आहे. पंतप्रधान कसा असावा तर तो नरेंद्र मोदींसारखा असावा. सरदार वल्लभभाई पटेलांनतर एवढा सक्षम, मजबूत नेता नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला पहायला मिळाल्याचं शिरसाट म्हणालेत.

मोदींचं नाणं चालत नाही - राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरे सुरु केलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. 'नरेंद्र मोदींचे नाणे घासून-पुसून गुळगुळीत झालंय. आता मोदी-मोदी बाजारात चालत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: फक्त दारूच नाही तर 'या' ७ सवयींनी लिव्हर होतं खराब

Maharashtra Live News Update: नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

SCROLL FOR NEXT