Sajay Shirsath Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सरकारचा पैसा आहे, कितीही मागा आपल्या बापाचं काय जातंय; मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत

sanjay shirsat news : माणिकराव कोकाटे यांच्यानंतर संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने नाव वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

माणिकराव कोकोटे यांच्यानंतर संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य

शिरसाटांच्या वक्तव्याने नवा वाद

अकोल्यातील कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही राज्यातल्या महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानं काही केल्या थांबता थांबत नाहीयेत. आता परत नव्याने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ठ सरकारच्या मागं लागण्याची चिन्ह आहेत.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी शहरात होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एक विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'सामाजिक न्यायभवनाच्या वस्तीगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी' अशा कितीही रक्कम मागा. आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे... आपल्या बापाचं काय जातंय" असं वादग्रस्त विधान शिरसाट यांनी केलंय. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते.

अकोल्यातील याच कार्यक्रमात स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाट यांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. मिटकरी तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतो. मात्र, तू जास्त बोलू नकोस, नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिलाय.

राज ठाकरेंनी कुणाच्या व्यासपीठावर जावं आणि काय बोलावं?, यावर आपण काही बोलू शकत नसल्याचं मंत्री संजय शिरसाठ म्हटलेय. तर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुरावे देण्यापूर्वी 2029 ची निवडणूक झालेली असेल असं ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Cyclone Alert : ‘मोंथा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोसळधार?

Bihar Chhath Puja : छठ पूजेच्या उत्सवावर दु:खाचा डोंगर, बिहारमध्ये ८३ जणांचा मृत्यू

Auspicious Yog Today: आज कार्तिक शुक्ल सप्तमी; बुध ग्रहाची कृपा आणि चंद्राचा मकर प्रवेश ठरणार शुभ

Beach Travel: गर्दीपासून सुटका हवीये? पर्यटकांना भुरळ घालणारे ८ सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारे, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT