Donald Trump news Saam tv
महाराष्ट्र

संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र, पश्चिम बंगालच्या निकालावर खडे बोल सुनावले

Sanjay Raut Latest News | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहित लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Namdeo Kumbhar

Narendra Modi Latest Update : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिलेय. होय, पश्चिम बंगालच्या निकालावर राऊतांनी संताप व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकशाही शेवटचे आचके देत आहे आणि डोनाल्ड ट्रॅम्प यांच्याकडून मोदींचे अभिनंदन केल्याचे कानावर येत असल्याचे राऊत म्हणाले. पश्चिम बंगालच्या निकालावर अनेकांनी तक्रारी आणि संशय व्यक्त केला आहे. आशावेळी बाहेरून दिलेली पावती घाईची असल्याचेही त्यांनी म्हटलेय.

भारताचा एक खासदार या नात्याने मी हे पत्र लिहित आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आपण पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केल्याचे समजले. त्याबद्दल मला काही गोष्टी मांडायच्या आहेत. ही निवडणूक एका राज्याची होती. हा भारताच्या लोकशाहीचा अंतर्गत प्रश्न आहे. अशा वेळी बाहेरून दिलेली पावती घाईची आणि चुकीची वाटते. या निवडणुकीत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचे आरोप आहेत. निवडणूक आयोगाने निष्पक्ष काम न करता भाजपची बाजू घेतल्याची लोकांची भावना आहे. यामुळे यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे राहिले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात तैनात केलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांमुळे लोकांमध्ये सुरक्षिततेऐवजी दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जातंय. ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी या निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या आहेत. लोकांच्या मनात असलेली ही अस्वस्थता दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही राऊत म्हणाले.

लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक होणं नव्हे, तर ती पारदर्शक आणि निष्पक्ष असणं महत्त्वाचं आहे. प्रक्रियेवरच जेव्हा गंभीर आरोप होतात. तेव्हा त्याचं कौतुक करण्याऐवजी चौकशी होणं गरजेचं असतं. अभिनंदनपर विधान करण्यापूर्वी आपण या गोष्टींचा विचार केला होता का? आपण लोकशाही मानणारे आहात, त्यामुळे आपण या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने आणि संतुलितपणे पाहावे, अशी मी विनंती करतो, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT