Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Mangal Dosh Remedies: जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही 'मंगळ दोष' असेल, तर आजच हे अचूक उपाय करून पहा. या उपायांचे पालन केल्याने मंगळ दोष निघून जातो.
Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष
Published On
Summary
  • मंगळ दोषामुळे लग्न जुळण्यास उशीर होऊ शकतो, अशी ज्योतिषशास्त्रातील मान्यता आहे.

  • हनुमान पूजा, मंत्रजप आणि दानधर्म यांसारखे उपाय प्रभाव कमी करण्यासाठी सुचवले जातात.

  • वैवाहिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी पत्रिका जुळवणीला महत्त्व दिले जाते.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत 'मंगल दोष' असतो, त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मंगळ दोषामुळे लग्न जमण्यासही अडचणी येत असतात. वैवाहिक जीवनातही तणावाची स्थिती असते. ज्याला मंगळ आहे, त्याने मंगळ असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करावं अशी देखील मान्यता आहे. या दोषामुळे पती किंवा पत्नी यांपैकी एकाचा मृत्यूही ओढवू शकतो. यामुळे मंगळ दोष असलेल्या तरुण-तरुणींनी मंगलिक जोडीदारच निवडावा.

विवाहासाठी पत्रिका जुळवताना कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानातील मंगळाच्या स्थितीचा विचार केला जातो. हिंदू ज्योतिषशास्त्राच्या परंपरेनुसार, जर मंगळ कुंडलीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात स्थित असेल, तर त्या व्यक्तीला 'मंगळ दोष' असल्याचे मानले जातं.

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष
Guru Pushya Yog 2026: तीन राशींचं आयुष्य पलटणार; प्रेम असो की नोकरी, प्रत्येक ठिकाणी नशीब देईल साथ

यांपैकी केवळ आठवे आणि बारावे स्थान अशुभ मानले जाते. जर मंगळ आठव्या किंवा बाराव्या स्थानात स्थित असेन तर त्याचा परिणाम शारीरिक क्षमता आणि आयुर्मानावर होत असतो. या स्थानांमध्ये मंगळावर शुभ प्रभाव असल्यास संबंधित व्यक्तीमध्ये या ग्रहाशी निगडित सकारात्मक गुण दिसून येतात. याउलट, जर त्यावर अशुभ प्रभाव असेल, तर व्यक्तीमध्ये नकारात्मक गुण दिसून येत असतात.

मंगळ दोष दूर करण्याचे ५ खात्रीशीर आणि सोपे उपाय

१. भगवान हनुमानाची उपासना

मंगळवारी भगवान हनुमानाची उपासना करा. अत्यंत भक्तीभावाने आणि निष्ठेने बजरंगबलीला शेंदूर अर्पण करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. तसेच, मंगळवारी उपवासही करा. या उपासनेचे पालन केल्याने 'मांगलिक दोष' दूर होण्यास मदत होते.

२. लाल रंगाच्या वस्तूंचे दान करा

मंगळ ग्रहाचा रंग लाल असल्याने, या रंगाशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने मंगळ देव प्रसन्न होतात. मंगळवारी गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात लाल मसूर डाळ, लाल कापड, तांबे, गूळ किंवा लाल फुले दान करा. हा उपाय केल्याने 'मंगळ दोष' शांत होण्यास मदत होते.

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष
Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

महामृत्युंजय मंत्राचा जप

तुमच्या वैवाहिक जीवनावरील मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी, महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. प्रत्येक मंगळवारी, शिवलिंगाला लाल चंदनाचा टिळा लावा आणि 'ओम नमः शिवाय' तसेच महामृत्युंजय मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.

मूंगा (Coral) रत्न धारण करा

मूंगा रत्न धारण केल्याने मंगळ दोष कमी होण्यास मदत होते. जन्मकुंडलीतील मंगळाच्या प्रभावावर आधारित हे रत्न धारण केले जाते.

मंगळ देवाची पूजा

'मंगळ दोष' शांत करण्यासाठी विधीवत मंगळ देवतेची पूजा करावी. पूजेनंतर भगवान मंगळाच्या 'ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः' किंवा 'ॐ अं अंगारकाय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावे.

अंगारेश्वर महादेव मंदिर (उज्जैन)

उज्जैनमधील अंगारेश्वर महादेव मंदिर हे 'मंगल दोष' निवारणाशी संबंधित विधींसाठी महत्त्वाचे आहे . येथील शिवलिंगावर 'भात पूजन' (शिजवलेल्या भाताने केलेली पूजा केल्याने मंगल दोषाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला मंगल दोषापासून त्वरित आराम हवा असेल, तर तुम्ही या मंदिरात नक्कीच पूजा करावी.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि प्रचलित परंपरांवर आधारित आहे. यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. साम टीव्ही या गोष्टीशी सहमत नाहीये.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com