नागपूर - शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातील भेटीगाठींचा कार्यक्रम रद्द करून पदाधिकाऱ्यांच्या सर्व बैठका रविभवन येथे घेण्याचे ठरविलं आहे. राऊतांचा हा निर्णय शिवसेना संपर्क प्रमुखांना एकप्रकारचे धक्का असल्याचे मानला जात आहे. आतापर्यंत नागपूरातील गणेशपेठ शिवसेना (Shivsena) भवन सोडून पक्षाच्या सर्व बैठका संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्याच कार्यालयात व्हायच्या. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती.
हे देखील पहा -
शिवसेनेला खासगी मालमत्ता केल्याचा आरोप केला जात होता. याची तक्रार मुंबईतील नेत्यांकडे करण्यात आली. त्यानंतर सर्व महत्त्वाच्या बैठका आणि स्थानिक पातळीवर धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेना भवनचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नव्हती.
आता संजय राऊत यांचा कार्यक्रम आखताना महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया यांच्याकडे असलेल्या विधानसभेचा आढावा घेण्यासाठी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातच बैठका लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा नाराजी सुरू झाली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी संपर्क प्रमुखांच्या घरी भोजन आणि कार्यालयाला भेट हा कार्यक्रम कायम ठेवला. बैठका मात्र रविभवनच्या सभागृहात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज शिवसेनेच्या बैठका रवी भवनात होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.