SANJAY RAUT SLAMS MAHAYUTI OVER POSSIBLE UDDHAV–RAJ THACKERAY ALLIANCE Saam TV News
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'बेगानी शादी में ठाण्याच्या अब्दुल्लाचं काय काम?' राज-उद्धव युतीवरून राऊतांनी शिंदेंना सुनावलं

Sanjay Raut Slams Mahayuti: उद्धव-राज ठाकरे युतीच्या चर्चांवरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; “ठाकरे एकत्र येणार, म्हणून इतका तिळपापड कशासाठी?” असा रोखठोक सवाल उपस्थित.

Bhagyashree Kamble

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. दोघांकडून वेळोवेळी सकारात्मक संकेत दिले जात असले तरी प्रत्यक्षात टाळी काही अद्याप वाजली नाही. दरम्यान, महायुतीतील प्रमुख नेते मात्र राज ठाकरे यांची भेट घेत असल्याचे चित्र दिसते. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

१९ जून रोजी दोन्ही शिवसेना गटाने वर्धापन दिन साजरा केला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी सभा घेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी जळजळीत उत्तर दिलं. एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव - राज ठाकरे यांच्या युतीवरून 'बेगानी शादी में ठाण्याच्या अब्दुल्लाचं काय काम?', असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच 'दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर, त्यांचा इतका तिळपापड का होतोय?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कालच्या सभेत एकनाथ शिंदेंनी, 'मेलेल्यांना काय मारायचे' अशी टीका केली होती. शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधनाची शिवसैनिकांनी नोंद घेतली आहे, असं ते म्हणाले. तसेच येत्या काळात राज्यातील जनता कुणाला मारते हे लवकरच कळेल, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ठाण्याच्या अब्दुल्लाचं काय संबंध?

'दोन ठाकरे एकत्र येत असतील तर, यांचा इतका तिळपापड का होतोय?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच विधानसभेत हे सरकार ईव्हिएमच्या ऑक्सिजनवर जिवंत असल्याचा टोला त्यांनी लगावला. '२ ठाकरे एकत्र येत आहेत, म्हणून त्यांची झोप उडालेली आहे. अघोरी पूजा, रेड्याची कापलेली शिंग, याचा काहीही उपयोग होत नाही. कापलेल्या रेड्याची साथ मिळत नाही. फडणवीसांनी तुमची काय अवस्था करून ठेवली आहे. पाय पुसणं केलंय तुमचं', असा घणाघात संजय राऊतांनी केला.

ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही

राज ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, असे संकेत राऊतांनी दिले. मराठी माणसाची एकजूट या देशात नवीन ताकद निर्माण करेल. ठाकरे ब्रँड हा देशातील सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा, कुणालाही ठाकरे ब्रँड डॅमेज करता येणार नाही, असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

SCROLL FOR NEXT