sanjay raut Saam Tv
महाराष्ट्र

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

Sanjay Raut On Sachin Ghaiwal: सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राजकारण तापलंय. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ नाही तर गुंडांची टोळी चालवत असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. त्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडत आहेत? आणि योगेश कदमांची कुणी पाठराखण केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऐकलंत...कुख्यात गुंड सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्रपरवाना देण्याचा आदेश वादात सापडलाय. हाच धागा पकडून फडणवीस हे कॅबिनेट नाही तर गुंडांची टोळी चालवत असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

खरंतर सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ.निलेश घायवळ आणि सचिन घायवळ पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात गँग चालवतात.अशा कुख्यात गँगस्टरच्या शस्त्रपरवाना देण्यासाठी नियमांची पायमल्ली केली असेल तर कारवाईचा इशारा देत अजित पवारांनी योगेश कदमांची कोंडी केलीय.

विरोधकच नाही तर सत्ताधारीही खिंडीत गाठायला लागल्याने योगेश कदमांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय.यावेळी शिंदेंनी चुकीचं केलं नाही तर घाबरण्याचं कारण नाही, असं म्हणत कदमांची पाठराखण केलीय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घायवळला शस्त्रपरवाना दिलाच नसल्याचं स्पष्ट केलंय.

खरंतर,आधी रोहित पवारांनी सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असल्याची शक्यता वर्तवली होती. तर रामदास कदमांनीही शस्त्रपरवाना प्रकरणी राम शिंदेंकडेच बोट दाखवलं.आता सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिला नसल्याचं सांगत सत्ताधारी हात झटकत आहेत. मात्र 2 दिवसांपासून सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिला की नाही? दिला असेल तर त्यासाठी कुणी शिफारस केली? यातील संदिग्धता कायम ठेवली जातेय.मात्र हे असं असलं तरी शस्त्रपरवान्याचे आदेश देऊन सर्वसामान्यांच्या मुळावर उठणाऱ्या गुंडांना पोसणारी राजकीय व्यवस्था आता उघडी पडत चाललीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

SCROLL FOR NEXT