Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maratha Reservation GR : भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २ सप्टेंबर रोजी जारी केलेला जीआर फक्त मराठवाडा प्रदेशासाठी लागू असल्याचं सांगितलं. नागपूरमधील ओबीसी आंदोलनादरम्यान दिशाभुल केली जात असल्याचेही ते म्हणाले.
Maratha Reservation GR
Minister Chandrashekhar Bawankule clarifies that the Maratha reservation GR is applicable only to the Marathwada region, not the entire state.saam tv
Published On
Summary
  • मराठा आरक्षणाचा जीआर फक्त मराठवाडा प्रदेशापुरता

  • नागपूरातील ओबीसी मोर्चावर बावनकुळे यांनी सरकारच्या भूमिकेचं स्पष्टीकरण दिलं.

  • जो खरा कुणबी असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळेल, असं बावनकुळे म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलाय. मराठा आरक्षणाचा जीआर हा फक्त मराठवाड्यापुरताच असल्याचं भाजप मंत्री म्हणालेत. त्यामुळे राज्यातील इतर मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही नका, प्रश्न मराठा बांधवांना पडलाय. नागपुरात झालेल्या ओबीसी मोर्चावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलंय.

Maratha Reservation GR
Manoj Jarange : मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; सव्वा तास बंद दाराआड काय चर्चा झाली?

नागपुरातील ओबीसी मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा नियोजितपणे दिशाभूल करण्यात आली. दोन सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्या पुरता मर्यादित आहे. हा जीआर मराठवाड्याबाहेरचा नाहीये. बैठक झाली तेव्हा वडेट्टीवार आणि इतर प्रतिनिधी आले होते. प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला. या जीआरचा कुणाची दुरूपयोग करणार नाही. जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

Maratha Reservation GR
मराठा आरक्षणाचा GR रद्द करा; नाहीतर मुंबई, पुणे, ठाणे जॅम करू; वडेट्टीवारांचा इशारा

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही

ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही, असं वचन शिष्टमंडळाला दिलंय. त्यांना अजून खुलासे हवे असतील, स्पष्टीकरण हवं असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत. आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजच हित आमच सरकार जाऊ देणार नाही. हा जीआर केवळ हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेला आहे. केवळ मराठवाड्यापुत मर्यादित, राज्यात कुठेही हा जीआर लागू नाही. ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवली पाहिजे, असं बावनकुळे म्हणालेत.

उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं, वडेट्टीवार त्यावेळी मंत्रालयात होते. देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून दिलं. सत्तेत असताना काही करायचं नाही, आणि सत्ता गेल्यावर कांगावा करायचा, असं म्हणत बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com