Sanjay raut Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: १५००, ५०० अन् आता लाडकींची किंमत ०, लाडकी बहीण योजनेबाबत दावा करत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut Questions Governments Financial Management: मुख्यमंत्री लाडकी बहीण" योजना वादात; लाभार्थ्यांना १५०० ऐवजी ५०० रुपये, संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका.

Bhagyashree Kamble

राज्यात गाजत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही योजना राज्यभरात गाजली. पण आता सरकारकडून लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्यात येत आहे. तसेच काही निकष लागू केले आहेत. या योजनेअंतर्गत यापूर्वी १५०० रूपये मिळणाऱ्या काही महिलांना आता केवळ ५०० रूपये दिले जाणार आहेत. या बदलावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत शून्य होईल, असे राऊत म्हणालेत.

'८ लाख लाडक्या बहिणींना आता १५०० रूपयांवरून फक्त ५०० रूपये देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींकडून १५०० रूपयांच्या बदल्यात सत्ताधाऱ्यांनी मतं विकत घेतली. त्या मतांची किंमत आता ५०० वर आली आहे. उद्या त्याची किंमत शून्य होईल.

महाराष्ट्र या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही आव आणला तरी, हे राज्य चालवणं आता आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही.

गेल्या साडेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे. हे राज्य आता आर्थिक अराजकाच्या खाईमध्ये सापडलंय. मी आणि अजित पवार बोलत जरी नसलो तरी, ते देखील चिंतेने ग्रासले आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे तक्रार केली. अजित पवार आमच्या फाईली मंजूर ते करत नाही. आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला निधी देत नाही, म्हणजे नेमकं कुणाला? असा प्रश्न आम्हाला पडतो. तुमचे सोबत जे किती ५ - २५ आमदार आहेत, ते सगळे गद्दार आहेत. ते फक्त पैसे आणि निधीसाठी तुमच्यासोबत आहेत. त्यांना फक्त राज्य लुटायचे आहे, आणि या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का? असा खोचक सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT