Yojana: फक्त 'या' लाडक्या महिलांच्याच खात्यात खटाखट २१०० रूपये येणार; पण १ अट पूर्ण झाली नाही तर..

Haryana Women to Get Rs 2100 Under Lado Lakshmi Yojana: हरियाणा सरकारनेही महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव 'लाडो लक्ष्मी योजना' असे आहे. ही योजना केवळ महिलांसाठी असून, त्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते.
laxmi yojana
laxmi yojanaSaam tv
Published On

देशातील प्रत्येक राज्य विविध कल्याणकारी योजना राबवत असतात. या योजनांचा फायदा सर्वसामान्यांना होतो. सध्या विविध राज्यातील सरकार खास महिला सक्षमीकरणावर अधिक भर देत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. आता हरिणायातही महिलांसाठी खास योजना राबविण्यात येत आहे.

'लाडो लक्ष्मी योजना' असे हरियाणात राबवण्यात येणाऱ्या योजनेचे नाव आहे. ही योजना खास महिलांसाठी असून, या योजनेचा फायदा खास महिलांना होतो. लाडो लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २१०० रूपये दिले जातात.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी, भाजपने सत्तेत परत आल्यास महिलांना दरमहा २१०० रूपये आर्थिक मदत देऊ, असे आश्वासन दिले होते. याच आश्वसनाची पुर्तता त्यांनी केली आहे.

laxmi yojana
Crime: बापाला कॉल गर्लसोबत फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडलं, रागाच्या भरात लेकावर गोळ्या झाडल्या; मुलगा रक्तभंबाळ

कोणत्या महिलांना दरमहा २१०० रूपये मिळतील?

हरियाणातील प्रत्येक महिलांना २१०० रूपयांची मदत मिळणार नाही. हरियाणा सरकारने लाडो लक्ष्मी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत. या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

laxmi yojana
Beed News: 'तुझा मुलगा आमच्या ताब्यात, ५ लाख दे नाहीतर..' बीडमध्ये सिनेस्टाईल मुलाचे अपहरण

अटी पुढीलप्रमाणे

हरियाणामधील ज्या महिलांकडे सक्रिय बीपीएल रेशन कार्ड आहे, त्यांनाच दरमहा २१०० रूपये देण्यात येईल. यासोबतच महिलेकडे कुटुंब ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. यासह महिलांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक्ड असावे. हरियाणातील महिलांकडे या गोष्टी असतील तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यांच्या खात्यात खटाखट २१०० रूपये जमा होतील.

पण जर तीन अटींपैकी एकही अट पूर्ण झाले नाही, किंवा कागदोपत्रे वेळेवर जमा केले नाही, तर हरियाणातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com