Devendra Fadnavis | Sanjay Raut  SaamTvNews
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार, महाराजांनी कडेलोट केला असता', संजय राऊत संतापले, मालवण राड्यावरुन फडणवीसांवर तोफ डागली!

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: "राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी एवढा भ्रष्टाचार, व्यभिचार अन् अनाचार केला, तेवढा कोणी केला नसेल," असं संजय राऊत म्हणाले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. २९ ऑगस्ट २०२४

मालवणमधील राजकोट किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील शिवप्रेमी तसेच विरोधकांकडून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. अशातच काल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मालवणमध्ये घटनास्थळी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे, निलेश राणे आणि नारायण राणे आमने- सामने आल्याने मोठा गोंधळ झाला. यावेळी निलेश राणे, नारायण राणेंनी पोलिसांनाही अरेरावीची भाषा केली, या संपूर्ण राड्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासमोर काल राडा झाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? अशा घटनांचे तुम्ही समर्थन करता? कायतर म्हणे त्यांची भाषा आहे. मगं आम्हीही बोलतो, आमच्यावर का गुन्हे दाखल करता? प्रश्न छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा नसून यानिमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार फडणवीसांच्या काळामध्ये उध्वस्त झाली आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती ही नावे घेता, तोंडी लावायला. पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी एवढा भ्रष्टाचार, व्यभिचार अन् अनाचार केला, तेवढा कोणी केला नसेल," असं संजय राऊत म्हणाले.

हजारो कोटींचा भ्रष्टाचार!

तसेच "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, हेच पैसे पुढे राजकारणासाठी निवडणुकीत वापरले. आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या व्यवहारातही भाजपने पैसे खाल्ले. शिवाजी महाराजांच्या संदर्भात भाजपने केलेले कृत्य निंदनीय आहे. महाराज असते तर त्यांचा कडेलोट केला असता. त्यामुळेच १ तारखेला आम्ही महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले राज्यभरात जोडे मारो आंदोलन करणार आहोत," अशी घोषणाही राऊत यांनी केली.

गृहमंत्री कुठे आहेत?

"काल मालवणमध्ये झालेला प्रकार निर्लज्जपणाचा कळस आहे. पोलिसांना भररस्त्यात शिव्या घालता, कॉलर पकडता. हा काय प्रकार आहे. गृहमंत्री आहात ना? तुमच्या काळजाला धक्का बसला नाही का? माझ्या पोलिसांवर माझ्या पक्षाचे गुंड धक्काबुक्की करतायेत, शिव्या घालतायेत काय चाललंय या राज्यात? राष्ट्रपती कुठे आहेत? राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधील घटनांची काळजी वाटते. महाराष्ट्रात महाराजांचा पुतळा कोसळला तरी वेदना झाल्या नाहीत का?" असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT