Sanjay Raut Slams Ajit Pawar Saam
महाराष्ट्र

'अजित पवार चोरांचे सरदार', ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप, पाहा VIDEO

Sanjay Raut Slams Ajit Pawar: अजित पवारांचा महिला आयपीएस अधिकाऱ्याशी फोन कॉलचा व्हिडिओ व्हायरल. खडी उत्खनन थांबवण्याचे आदेश देताना धमकी दिल्याचा आरोप. खडी उत्खनन थांबवण्याचे आदेश देताना धमकी दिल्याचा आरोप.

Bhagyashree Kamble

  • अजित पवारांचा महिला आयपीएस अधिकाऱ्याशी फोन कॉलचा व्हिडिओ व्हायरल.

  • खडी उत्खनन थांबवण्याचे आदेश देताना धमकी दिल्याचा आरोप.

  • संजय राऊतांनी पवारांवर सरळ हल्लाबोल, "चोरांचा सरदार" अशी टीका.

  • या प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका पोलीस अधिकारी महिलेला फोनवरून तंबी दिली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चर्चेत आला. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि अजित पवारांच्या व्हिडिओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर नेत्यांनी पवारांवर टीका केली. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून थेट सुनावलं आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. शिंदे, अजित पवार यांच्याकडेच माणसं चोर, डाकू, स्मगलर, बलात्कारी आहेत. अशी टीका राऊतांनी महायुतीच्या मंत्र्यांवर केली. 'शिंदे, अजित पवार यांच्याकडे माणसं चोर, डाकू अन् स्मगलर बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी या नेत्यांना सत्ता हवी आहे.'

'आमदार सुनील शेळकेंचं प्रकरण मी बाहेर काढलं. बेकायदेशीर खाणकाम सुरू होतं. त्यांनी सरकारला कोट्यावधींचा चुना लावला. अजित पवार त्यांना संरक्षण देतात. मोदींनीही अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आहे. आता ते आयपीएस अधिकाऱ्याला दम देतायेत. ते फार शिस्तबद्ध आहेत का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'मी बेशिस्त खपवून घेणार नाही, असं ते म्हणतात. मग आता काय झालं? एका आयपीएस अधिकारी महिलेला तुम्ही दम देताय? तेही तुमच्या पक्षातील चोरट्यांना संरक्षण देण्यासाठी? ' असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला.

'अजित पवारांना नैतिकदृष्ट्या सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेला माणूस आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा देण्यास सांगत आहे. अजित पवार इतरांना कायदा शिकवता, मग तुम्ही काय करताय? तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात', अशी थेट टीका राऊतांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT